मनसेनं केली सात कार्यकर्त्यांवर कारवाई, ५० कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

पुणे : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून रणधुमाळी आज संपणार आहे.  अशातच पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे 50 मनसैनिकांनी आपले राजीनामने दिल्याची माहिती आहे.

मनसेने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी मविआच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली. एकाचवेळी 50 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.