---Advertisement---

Jalgaon Crime News : ‘तुझ्या पतीला…’, जळगावात ५० वर्षीय महिलेस अश्लील शिवीगाळ

---Advertisement---

जळगाव : तुझ्या पतीला, मुलाला घराबाहेर काढ, त्यांना मारतो, असे हातात तलवार घेऊन घराच्या कंपाऊंडमध्ये येत संशयिताने ५० वर्षीय पीडित महिलेस अश्लील शिवीगाळ केली. मंगळवारी (१ एप्रिल) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार शेखर उर्फ काल्या संजय भारोटे (वय २५) याच्यावर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार योगेश माळी हे तपास करीत आहेत.

सिंधी कॉलनीतून दुचाकीची चोरी; दोघे गजाआड

जळगाव : सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ मंदिराजवळ ३० मार्च रोजी पार्किंग केलेली सीबी झेड दुचाकी (एमएच १९- बीए १७३७) चोरून नेली होती. हा गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र गतिमान फिरवित शनिपेठ हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार याला ताब्यात घेतले. त्याबरोबर त्याच्या साथीदारालाही पथकाने अटक केली. या दोघांकडून सिंधी कॉलनीतील सीबीझेडसह शहर पोलीस ठाण्यात दाखल चोरीची दुचाकीही हस्तगत केली.

व्यावसायिक यश मनोहरलाल अहुजा (वय २४, रा. केमिस्ट भवन) हे त्यांच्या मालकीच्या सीबीझेडने सेवा मंडळ मंदिर परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास आले. त्यानंतर रात्री नऊ वाजता परतले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसली नाही. परिसरात शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी ३१ मार्च रोजी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी वाहन चोरी गुन्हे उघड कामी मार्गदर्शन केले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला नेमत तपासकामी रवाना केले.

पथकाने घटनास्थळापासून तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शनिपेठ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संजय मराठे हा सीबीझेड दुचाकी काढताना दिसून आला. पथकाने तत्काळ त्याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता त्याने या गुन्ह्यात माधव श्रावण बोराडे हा साथीदार सोबत असल्याची कबुली दिली. त्यालाही पथकाने ताब्यात घेतले. संशयितांकडून ८० हजार किमतीची सीबीझेड (एमएच १९-बीए १७३७), जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीची सुमारे ६० हजार किमतीची हीरो एचएफ डिलक्स (एमएच १९- बीटी ६९४५) असा सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, हवालदार गणेश शिरसाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, कॉन्स्टेबल किरण पाटील, नाना तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment