अबब… या नेत्याने बांधला ५०० कोटींचा पॅलेस!

मुंबई : राजकीय नेत्यांचा राजविलासी थाट हा नेहमीच चचेत ठरत असतो. यावर अनेकदा टीकाही होते. आता असाच एक वाद उफाळून आला आहे. एका माजी मुख्यमंत्र्याकडून ५०० कोटींचा पॅलेस बांधला जात असल्याने या मुद्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. बांधल्या जात असलेल्या या आलिशान पॅलेसमध्ये यामध्ये थिएटर हॉल, १२ आलिशान बेडरूम असून ४० लाख रुपये खर्च करून फक्त बाथरूम बांधण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येकी १२ लाख रुपये किमतीचे कमोड आहेत.

आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री वायएसआर जगन मोहन रेड्डी हे सध्या राजमहालमुळे चर्चेत आले आहेत. रुशिकोंडा येथील टेकडीवर हा महाल ९.९ एकर जागेवर बांधला जात आहे. यामध्ये थिएटर हॉल, १२ आलिशान बेडरूम, प्रत्येकी १५ लाख रुपये किमतीचे २०० झुंबर बसवण्यात आले आहेत. तसेच, या महालाच्या इंटेरिअरवर ३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय, या जगन पॅलेसमध्ये लाखो रुपयांची स्पा सेंटर्स आणि लाखो रुपयांची मसाज टेबल्स आहेत. यामध्ये बँक्वेटची सुविधा, अत्याधुनिक कॉन्फरन्स हॉल, मोठे कॉरिडॉर आणि शानदार लाईटिंगची व्यवस्था आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुशिकोंडा टेकडीवर बांधण्यात आलेल्या जगन पॅलेसमध्ये जवळपास सात ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. या इमारतींमध्ये सुपर लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा महाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीडीपीने म्हटले आहे की, हा महाल व्यक्तिगत वापरासाठी तयार केला जात आहे. तर  जगन मोहन रेड्डी यांच्या पार्टीकडून हा महाल जनतेसाठी तयार करण्यात येत आहे, असा दावा केला जात आहे.