एटीएममध्ये 53 लाखांची रोकड, दरोडेखोरांनी चक्क.. पण हाती काहीच आलं नाही

Crime : राज्यात चोरीचे सत्र सुरूच असून दिवसाआड मोठ्या प्रमाणात घटना समोर येत आहेत. खान्देशच्या धुळे जिल्हयात पुन्हा एक घटना घडली आहे मात्र यावेळी चोरट्यांना अपयश आल आहे.

नेमकं काय घडलं?
धुळे तालुक्यातील नेर येथील महामार्गावर असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएमला चोरट्याने टार्गेट करीत फोडल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडीस आली. यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली मात्र सुदैवाने चोरट्याला कॅश ट्रे बाहेर काढता न आल्याने एटीएममध्ये असलेली 53 लाखांची रोकड बचावली. पोलिस प्रशासनाने सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधलेला चोरटा आढळून आला. या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याचा स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.