मुंबई : कोरोना विषाणूच्या संक्रमणाने संपूर्ण जग हादरुन गेले. यात अनेकांनी आपले आप्त गमवले. मागील काही काळापासून कोरोनाचे बाधित आढळणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आता सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या दक्षिण पूर्व आशियात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. अशातच आता भारतातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
भारतात एकूण बाधित २५७ तर १६४ संशयित आहेत. मुंबईत मंगळवारी बाधितांची संख्या ५६ झाली आहे. तर सक्रिय बाधितांचा आकडा ४४ ने वाढण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आशियातील काही भागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असत्याचे म्हटले आहे. मात्र महानगरपालिकेने शांतता राखण्याचे आणि पाळत ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. पुण्यात नव्याने एका वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५७ वर पोहोचली आहे. यंदाच्या वर्षातील पुण्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट जेएन १ ओमिक्रॉनचा नवीन व्हेरिएन्ट, जेएन १ आणि त्याचे उप-प्रकार एलएफ ७ आणि एनबी १.८, संसर्गासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. हा नवीन व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचा पूर्वर्वीपेक्षा वेगाने पसरत असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, असा विश्वास आहे की, ही लाट कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांवर परिणाम करू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बचावासाठी करा हे उपाय
कोरोनाच्या वाढत्या बाधितांमुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. खोकताना, शिंकताना आपले तोंड आणि नाक झाका. आपले हात चांगले धुवा.