नवी दिल्ली : भारतात ५ जी सेवा सुरु झाल्यानंतर ५ जी सेवा देणार्या स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. बाजारात अनेक कंपन्यांनी ५ जी स्मार्टफोन उतरवले आहेत. यातील तुमच्या खिशाच्या बजेटला परवडतील असे स्वस्त आणि मस्त ५ जी स्मार्टफोन कोणते आहेत? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्ही ५ जी फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला ही माहिती निश्चितच उपयोगी ठरेल.
रेडमी ११ प्राईम
६.५८ इंचाचा फूल एचडी प्लस डिस्प्ले, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मीडिया टेक डायमनसिटी ७०० हा प्रोसेसर अशी दमदार फिचर्स असलेला रेडमी ११ प्राईम हा ५ जी फोन केवळ १४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. कॉर्निंग गोरिला ग्लासचे संरक्षणही या फोनला मिळते.
रिअलमी ९ आय
६.६ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले, ऑक्टाकोअर मीडिया टेक प्रोसेसरसह ५० मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा या फोनमध्ये असून प्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. सोबत ५००० एमएएचची बॅटरीही आहे. हा फोन देखील १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.
पोको एम ४
हा १५,१९९ रुपयांना येणारा फोन मीडिया टेक डायमनसिटी ७०० प्रोसेसरसह आहे. यामध्ये डयुअल सिम असणार असून ६.५८ इंचाचा फूल एचडी प्लस डिस्प्ले यात आहे. ५००० एमएएचची बॅटरी या फोनला असून ५० मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा पंट कॅमेरा यात आहे.
आयक्यूओओ झेड ६ लाईट
१३,९९९ रुपये ही स्मार्टफोनची किंमत असून स्नॅपड्रगन फोर्थ जनरेशन मोबाईल प्लॅटफॉर्मवर हा फोन सादर करण्यात आला आहे. ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी यात आहे. मोबाईल वेगाने चार्ज करण्यासाठी १८ व्हॅट फास्ट चार्जिंगची सुविधा यात आहे.
मोटोरोला मोटो जी ५१
४ जीबी आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोअरेजसह येणार्या या फोनला स्नॅपड्रगन ४८ प्लस ऑक्टाकोअर २.२ गीगाहर्टज प्रोसेसर आहे. ५००० एमएएचची बॅटरी यात असून ५० मेगापिक्सलचा कॅमेरा व १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा अशी सोय यात असेल. या स्मार्टफोनची किंमत १४,९४९ रुपये इतकी आहे.