नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊन दरम्यान, सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झालेली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोने ५६ हजार २०० रुपयांवर गेले होते. आता सोन्याच्या किमतीने पुन्हा उच्चांक गाठला आहे. MCX वर फ्युचर गोल्डने 56,245 ची नवीन पातळी गाठली आहे. मात्र 60 वर्ष जुन्या दागिन्यांचे बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सोन्याची किंमत पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की असेही घडले आहे.
1959 चे दागिन्यांचे बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये एक तोळा सोने (10 ग्रॅम) फक्त 113 रुपयांना दिसत आहे. आज अमूल किंवा कॅडबरी चॉकलेट एवढ्या किंमतीत मिळते. आपण असे म्हणू शकता की तेव्हा एका चॉकलेटच्या किंमतीला सोने उपलब्ध होते.
व्हायरल होत असलेले बिल महाराष्ट्रातील वामन निंबाजी अष्टेकर नावाच्या दुकानाचे 3 मार्च 1959 रोजीचे आहे. या पावतीवर एकूण दोन नोंदी आहेत. यापैकी पहिली नोंद ही 62 रुपयांची असून दुसरी 12 रुपयांची नोंद ही सोनं खरेदीची आहे. या व्यक्तीने 12 रुपयांची चांदी खरेदी केली होती. हे एकूण बिल 109 रुपयांचं आहे.
सोने आणखी महागणार?
तज्ज्ञांच्या मते, सोने 55,600 च्या वर राहिल्यास एमसीएक्सवर पुढील फेरीत ते 57,700 रुपयांपर्यंत पोहोचेल. आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे की, सोने आणखी पुढे गेले तर पुढील काही आठवड्यात ते 57,000 पर्यंत जाईल आणि तेथे त्याला प्रतिकाराचा सामना करावा लागेल.