नंदूरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा लाल मिरचीचे उत्पादन ६० टक्के वाढल आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बाजार समितीत सव्वा लाख क्विंटल मिरचीची आवक झाली होती. यंदा २ लाख क्विंटल मिरचीची आवक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
नंदूरबार जिल्ह्यात गेल्या वर्षी मिरचीला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी यंदाही अधिक क्षेत्रात मिरचीची लागवड केली. तर त्या सोबतच पोषक हवामान असल्याने मिरचीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे.
या हंगामात मिरचीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला. मात्र नंतर काही प्रमाणात मिरचीच्या दरात घसरण झाली होती. तरीदेखील आतापर्यंत दोन लाख क्विंटल पेक्षा अधिक मिरचीची आवक बाजारपेठेत झाली आहे.
आतापर्यंत झालेल्या आवकमध्ये साठ टक्के मिरची अधिक बाजारपेठेत दाखल झाली आहे. आणखीन काही दिवस मिरचीच्या हंगाम सुरू राहणार आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मिरचीची आवक जास्त असणार आहे.