---Advertisement---

Dhule News : नकोसे झाले जीवन; तीन महिन्यांत २५१, पंधरात तब्बल ६५९ जणांनी मृत्यूला कवटाळले

---Advertisement---

धुळे : जिल्ह्यासह शहरात गेल्या तीन महिन्यांत तब्बल २५१ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात ताणतणाव, अपेक्षाभंग, नैराश्य, बेरोजगारीमुळे तरुण, नापिकीसह अवकाळी पावसामुळे चिंतातुर असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच अन्य नैसर्गिक कारणेदेखील कारणीभूत ठरली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा महिन्यांत तब्बल ६५९ जणांनी हसत खेळत जीवनाला पूर्णविराम दिला आहे; मात्र समस्यांवर मात करायला शिकल्यास जीवनात यशस्वी होता येते. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देतात.

विशेष म्हणजे बेरोजगारीला कंटाळून उच्चशिक्षित तरुणांचा आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकजण आयुष्यात आता काहीच उरले नाही. असे समजून आत्महत्या करण्याचा विचार करतात. याकाळात त्यांचे योग्य समुपदेशन झाले पाहिजे.

आत्महत्या करण्यामागील कारणे काय ?

आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात तरुणांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. तरुणांनी आत्महत्या करण्यामागील कारणांमध्ये कुटुंबात विचारविनिमय, संवाद नसणे, प्रेमात उतावीळपणा करत, नैराश्य, रागावरील नियंत्रण सुटत चालले असून, सहनशीलता अंगात नसल्याने आणि मनातील राग, रोष, गैरसमज न-बोलता तसाच दाबून ठेवण्याबरोबर अन्य कारणावरून आत्महत्या होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुटुंबातील तरुणांशी संवाद वाढविला पाहिजे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

शहरी भागातील तरुणांची संख्या तुलनेने जास्तच

नैराश्य आणि बेरोजगारी या कारणावरुन आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या ही ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील जास्त आहे. याउलट वृद्धांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जास्त आहे. ग्रामीण भागातून आत्महत्या करणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. महिलांची संख्या मात्र शहरी भागातील जास्त आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment