---Advertisement---
बीड : गावातील समस्यांनी त्रस्त झालेल्या एका तरुणानं चक्क मोबाईल टावरवर चढूल आंदोलन सुरु केले आहे. आष्टी तालुक्यातल्या वाहिरा गावच्या अशोक शिवाजीराव माने या तरुणाने बीड शहरातील बालेपीर भागात असलेल्या टावरवर चढून आंदोलन करायला सुरुवात केली आहे.
सूत्रानुसार, आष्टी तालुक्यातील धानोरा ते वाहिरा या रस्त्याला नवीन मंजुरी देण्यात यावी, परिसरात असलेल्या वस्तीवरचे रस्ते दुरुस्त करावे, गावात असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी. या मागणीसाठी अशोक शिवाजीराव माने हा तरुणान गेल्या एक तासापासून बीड शहरातल्या बालेपीर भागातल्या एका टॉवरवर चढून बसला आहे.
तासाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे नागरीकांची गर्दी जमली आहे. दरम्यान यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून टॉवर परिसरात पोलिसांसह अग्निशामक दलाचे जवान तैनात झाले आहेत. आंदोलन करत असलेल्या तरुणाला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---Advertisement---