7वी ते 10वी पाससाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मेगाभरती जाहीर

7वी ते 10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मेगाभरती जाहीर करण्यात आलेली असून या भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.  अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच 17 नोव्हेंबर पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव 

1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
2) लघुटंकलेखक 16
3) जवान राज्य उत्पादन शुल्क 568
4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 73
5) चपराशी 53

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

वयाची अट: 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज फी :
पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

तुम्हाला किती पगार मिळेल?
लघुलेखक (निम्नश्रेणी) – S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक – S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क- S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क – S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी – S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

जाहिरात पहा – PDF