नंदुरबार : शिरपूर तालुक्यात विविध योजनेतून मंजूर विकास कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. यात रस्ता काँक्रीटीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, जलकुंभ उभारणे व पाईप लाईन करणे या कामांसह विविध गावांमधील 7 मंदिर परिसराला विकसित करणाऱ्या कामांचा समावेश आहे.
आमोदे २४० लक्ष, करवंद ११३ लक्ष, कुवे ९८ लक्ष, विखरण २३३ लक्ष, शिंगावे १३२ लक्ष, खर्दे बु ९९ लक्ष, उंटावद ७० लक्ष, या गावांमध्ये पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंदिर परिसरात सभा मंडप, संरक्षण भिंत जल जीवन मिशन योजना तसेच ठक्कर बाप्पा योजना, दलित वस्ती सुधार योजना, २५१५ इतर विकास योजना अंतर्गत मूलभूत सुविधांचे भूमिपूजन खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिरपूर नगरपालिका उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा लोकसभा प्रमुख डॉ. तुषार रंधे, धुळे जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, तालुका अध्यक्ष किशोर माळी, जि.प. सदस्य संजय पाटील आदी उपस्थित होते.
गावाचा विकास हाच आपला ध्यास, हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने प्रत्येक गावाच्या विकासाकरिता निधीचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यामुळे महिलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन सारख्या योजनांचा लाभ गावागावात पोहोचवला जात आहे. ज्या गावांना कधी हिशोबात घेतले जात नव्हते त्या गावांना आज कोटी रुपयाच्या निधीतून विकास कामे आम्ही मंजूर करू शकलो आहोत. प्रत्येक गावाला रस्ते गटारी वीज उपलब्ध करण्याबरोबरच महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या तसेच बेघरांना घरे देणाऱ्या योजनांना चालना दिली आहे. असे असले तरी भूमिगत गटारीसाठी सर्व्हे करण्यास सुरुवात केली असून तो ही निधी केंद्र शासनाकडून पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आता महिला बचत गटांना आर्थिक अनुदान म्हणून १०००० रुपये आर्थिक सहाय्य, मोफत गरजूंना दुधाळ गायी वाटप, युवकांना क्रिकेट साहित्य, कलाकारांना भजनी मंडळ साहित्य, ग्रामपंचायत भांडी, बॅड, मंडप साहित्य, कलापथक अशा अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या असून व महत्त्वाचे म्हणजे ज्या आदिवासी परिवाराला आजपर्यंत घर मिळाले नाही त्यांना शबरी घरकुल योजनेमधून मागाल तितके घरकुल देण्याचे नियोजन आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे; असे खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या.
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ राऊळ, पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील, यतीश सोनवणे, डॉ. शशिकांत पाटील, विनिता पाटील, सरपंच अरुणा पाटील, कनीलाल कोळी, सीमा गुजर, हिरालाल भिल, दीपक पाटील, हर्षाली देशमुख, यशपाल राजपूत, शरद भील, राजकपूर मराठे, मिलिंद पाटील, सविता पाटील, चंद्रकांत गुजर, रूपाली पाटील, नूतन पाटील, जगदीश देशमुख, रणजीत देशमुख, जगदीश पाटील, पिंटू राजपुत, शामसिंग गिरासे, कृष्नंदन राजपूत, शामसिंग गिरासे, विजयसिंग गिरासे, युवराज माळी, राज देशमुख, रमेश गिरासे, हर्षल राजपूत, नितीन गिरासे, महेंद्र राजपूत, रत्नदीप सिसोदिया, दीपक जमादार, भुरा राजपूत, भैया राजपूत, संदीप पाटील, महेंद्र राजपूत, जितू पाटील, अहिरे, बंडू गिरासे, पिंटू पाटील, जनराज पाटील, किसन बाबाजी, गंगाराम पाटील, प्रकाश पाटील, गजानन पाटील, दिनेश पाटील, निंबा पाटील, वसंत पाटील, कवरदास पाटील, मनोज बच्छाव, दशरथ पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, योगेश धनगर, चंद्रकांत पाटील, जगदीश पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, देविदास पाटील, मनोहर पाटील, छोटू बिल, राजू वाणी, शिरीष पाटील, आर एस, पाटील, पवार, बी. जे. पाटील, प्रकाश गुजर, राहुल पटेल, नंदन गुजर, भावड्या गुजर, नानू कोळी, शेखर माळी, गजू पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.