---Advertisement---

धक्कादायक ! पुण्यात एकाच दिवशी ७ जणांनी मृत्यूला कवटाळले

---Advertisement---

पुणे : शहरात आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे. अशातच पुन्हा एकाच दिवशी सात आत्महत्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या आत्महत्यांमध्ये विविध वयोगटांतील आणि समाजघटकांतील व्यक्तींचा समावेश आहे, ज्यामुळे समाजात अस्वस्थता पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्‍या हद्दीत सोमवारी एकाच दिवशी सात आत्‍महत्‍यांच्‍या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे साडेदहा वाजता गौरव ज्ञानेश्‍वर अगम (वय २८) या तरुणाने भिंतीवरील लोखंडी ब्रॅकेटला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुनावळे येथे प्रसाद संजय अवचट (वय ३१) यांनी दुपारी साडेचार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरीत गणपत लांडगे चाळ येथे विकास रामदास मुरगुंड (वय ३५) यांनी साडीच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजता घडली.

चौथ्या घटनेत, मुळशी तालुक्यातील शिंदेवस्ती, नेरे येथील मनाप्‍पा सोमल्‍या चव्‍हाण (वय ५२) यांनी घराशेजारील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. पवार चाळ, दत्तनगर, थेरगाव येथील नवनाथ भगवान पवार (वय ४६) यांनी पाऊण वाजेच्या सुमारास घरातील बेडशीटच्या साह्याने गळफास घेतला. या घटनेचा मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही, त्यामुळे त्यांचा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.

समीरा हाईट्स, ढोरेनगर, जुनी सांगवी येथील सुवर्णा श्रीराम पवार (वय ३६) यांनी रात्री ११.५४ वाजता छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखली येथील दिनेश सुरेश लोखंडे (वय ४०) यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. याबाबत आत्महत्या केल्याचे कारण स्पष्ट नाही.

या सात आत्महत्या एकाच दिवशी घडल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांमध्ये चिंता आणि अस्वस्थता पसरली आहे. सर्व घटनांचे तपास सुरू आहेत, मात्र या वेगवेगळ्या घटनांमुळे समाजामध्ये गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध समाजघटकांतील व विविध वयोगटातील लोकांनी आत्महत्या केल्यामुळे या समस्येचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

दरम्यान, सामाजिक आणि मानसिक समस्यांचे गांभीर्य समजून या घटनेवर संबंधित सर्व क्षेत्रांतून अधिक तपास आणि मदतीची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment