---Advertisement---

शिंदे गटाच्या या आमदाराने तुळजाभवानी देवीला अर्पण केलं ७५ तोळं सोनं

---Advertisement---

मुंबई : शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसबत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसंच दोन्ही नातवंडांचं जायवळ करायचं होतं. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. नवस केला होता तेव्हा ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्याचा हार देईन असं म्हटलं होतं. तो नवस पूर्ण केल्याचे सरनाईक यांनी सांगितलं.

देवीकडे मांडलेलं गार्‍हाणं पूर्ण झाल्यानेच पत्नी, दोन्ही मुलं, सूना आणि नातू यांना घेऊन आलो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मी पहिल्या मुलाच्या लग्नावेळी ५१ तोळ्याचा आणि दुसर्‍या मुलाच्या लग्नावेळी २१ तोळ्याचा हार घालेन असं म्हटलं होतं. पत्नीनेच साकडं घातलं असल्याने तिने सोनाराकडून दागिने बनवून घेतले होते. दोन वर्षांपासून ते दागिने आमच्याकडे होते. करोनामुळे मंदिरं बंद होती, तसंच इतर संकटं आमच्यावर होती त्यामुळे येऊ शकलो नव्हतो. पण आता आलो, अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment