8वी/10वी पास आहात का? ‘मनरेगा’ अंतर्गत जळगावात शेकडो पदे रिक्त, त्वरित अर्ज करा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जळगाव येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी झालेली आहे.आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्याची संधी असून पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीअंतर्गत 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदाचे नाव : संसाधन व्यक्ती

शैक्षणिक  पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.

उमेदवारांनी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात 18 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत. कागदपत्रे सोबत नसलेले आणि अपूर्ण माहितीसह प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.

जाहिरात पहा : PDF