दिल्लीतील प्रसिद्ध श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. इतर कैद्यांप्रमाणेच आफताबलाही दिवसा 8 तास तुरुंगाबाहेर ठेवावे आणि रात्री एकांत कोठडीत पाठवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. धोक्याची भीती लक्षात घेऊन न्यायालयाने हा आदेश दिला आहे.