Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी 80 कोटी लोकांना दिलासा देताना मोठी घोषणा केली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
आता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना जानेवारी 2024 पर्यंत मोफत धान्य दिले जाईल.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, कोरोना महामारी दरम्यान लोकांना मदत करण्यासाठी मोफत धान्य वितरण सुरू करण्यात आले होते, नंतर ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आले.
कोणाला मिळते मोफत धान्य
योजनेंतर्गत गरिबांना पक्के घर नसावे.,स्वतःची जमीन नसावी.,म्हैस/बैल/ट्रॅक्टर/ट्रॉली नसावी.,निश्चित व्यवसाय नसावा., कुक्कुटपालन/गाई पालन इत्यादी नसावेत., कोणताही आर्थिक सहाय्य व्यवसाय किंवा सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत नसावी., वीज कनेक्शन नसावे., असे लोक पात्र ठरणार नाहीत ज्यात एक सदस्य देखील आयकरदाता आहे., अशी कुटुंबे पात्र नाहीत, ज्यांच्याकडे चारचाकी किंवा ट्रॅक्टर आहेत.