---Advertisement---
---Advertisement---
8th Pay Commission : सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बऱ्याच महिन्यांपासून चर्चेत असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या तयारीला आता वेग आला असून, त्याच्या स्थापनेबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.
किती वाढू शकतो पगार ?
सध्या, लेव्हल-२ कर्मचाऱ्यांचा मूळ पगार दरमहा १९,९०० रुपये आहे. परंतु जर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या तर तो दरमहा सुमारे ५६,९१४ रुपये वाढू शकतो. म्हणजेच, सुमारे तीन पट वाढ शक्य आहे. तथापि, हा अजूनही अंदाज आहे, कारण आयोगाची स्थापना आणि त्याच्या शिफारशी अजून येणे बाकी आहे.
आठवा वेतन आयोग का आवश्यक ?
केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई, खर्च आणि राहणीमानाचा दर्जा लक्षात घेऊन दर काही वर्षांनी वेतन आयोग आणते. शेवटचा म्हणजेच ७ वा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू करण्यात आला होता आणि तेव्हापासून महागाई आणि खर्चात खूप वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार चांगले वेतन मिळावे म्हणून आता ८ व्या वेतन आयोगाची गरज भासू लागली आहे.
फक्त पगार वाढेल का?
फक्त पगारच नाही तर महागाई भत्ता (DA), प्रवास भत्ता (TA), आणि घरभाडे भत्ता (HRA) देखील वाढू शकतो. याशिवाय भविष्य निर्वाह निधी (PF), ग्रॅच्युइटी आणि पेन्शनच्या रकमेतही वाढ शक्य आहे.