इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. पण तो बराच वेळ गोलंदाजी करत नव्हता. इंग्लंड संघ सध्या भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतही बेन स्टोक्सने गोलंदाजी केली नाही, मात्र धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात स्टोक्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच चेंडूवर असे काही केले की ज्यांनी पाहिले त्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. धर्मशाला कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टोक्सने गोलंदाजी केली. तो नऊ महिन्यांनंतर गोलंदाजी करत होता आणि पहिल्याच चेंडूवर त्याने रोहित शर्माची विकेट घेतली.
स्टोक्सने धर्मशाला कसोटी सामन्यापूर्वी जून २०२३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटची गोलंदाजी केली होती. पण यानंतर न्यूझीलंड मालिकेदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो गोलंदाजी करू शकला नाही. जून 2023 नंतर, स्टोक्सने मार्च 2024 मध्ये कसोटीत गोलंदाजी केली, म्हणजेच जवळपास नऊ महिन्यांनंतर स्टोक्सने कसोटीत गोलंदाजी केली.
𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐍𝐓 𝐈𝐌𝐏𝐀𝐂𝐓 ft. skipper Stokes
#IDFCFirstBankTestSeries #BazBowled #INDvENG #JioCinemaSports pic.twitter.com/DPHz8Bfdvl
— JioCinema (@JioCinema) March 8, 2024
रोहितही समजू शकला नाही चेंडू
भारताच्या डावाच्या 62 व्या षटकात स्टोक्सने बॉल पकडला आणि पहिल्याच चेंडूवर रोहितला बोल्ड केले. स्टोक्सने ऑफ स्टंपच्या ओळीत चेंडू टाकला. हा चेंडू आत येईल असे रोहितला वाटले पण शेवटच्या क्षणी चेंडूने दिशा बदलली आणि थोडासा बाहेर आला. चेंडू रोहितच्या बॅटला चकवा देत थेट ऑफ स्टंपवर गेला. या चेंडूवर आऊट झाल्यानंतर रोहितही हैराण झाला. चेंडू कधी आणि कुठे गेला आणि त्याच्या स्टंपवर आदळला हे त्यालाच समजले नाही. मात्र, रोहितने आऊट होण्यापूर्वीच शतक पूर्ण केले होते. रोहितने 162 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह 103 धावा केल्या. भारताची दुसरी विकेट म्हणून रोहित बाद झाला. यासह रोहित आणि शुभमन गिल यांच्यातील १७१ धावांची भागीदारीही तुटली.