---Advertisement---

RAW च्या या 9 ऑपरेशनची माहीत वाचून अभिमानाने फुगेल तुमची छाती

---Advertisement---

द रिसर्च अँड अँनालायसिस विंग ची अभिमानास्पद डिक्लासिफाइड ०९ ऑपरेशन्स…

१.ऑपरेशन स्माईलिंग बुद्धा.
स्माइलिंग बुद्धा हे भारताच्या अणुकार्यक्रमाचे नाव होते.संपूर्ण ऑपरेशन चा टास्क RAW ला देण्यात आला होता आणि भारतातील इंटर्नल प्रोजेक्ट मध्ये सहभागी होण्यास त्यांना पहिल्यांदाच सांगण्यात आले होते. RAW ने १८ मे १९७४ रोजी राबवलेल्या “ऑपरेशन स्माईलिंग बुद्धा ” मध्ये भारताने पोखरण येथे १५ किलोटन प्लुटोनियम डिव्हाइस ची यशस्वी चाचणी घेऊन ,अण्वस्त्रांसाठी असलेल्या राष्ट्रांच्या एलिट क्लब मध्ये एंट्री केली होती. हे ऑपरेशन राबवताना RAW ने कोणतीही सिरीयस अडचण येऊ दिली नाही, इतकेच नाही तर ह्या न्यूक्लियर टेस्ट चा थांगपत्ता अमेरिका, चीन आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनाही लागू शकला नव्हता.

२.ऑपरेशन खलिस्तान मोमेंट्स :-
१९८० च्या दशकात आयएसआयच्या पाठिंब्याने खलिस्तानी दहशतवाद भारतात शिगेला पोहोचला होता. अत्यंत कठीण परिस्थिती त्यावेळेस भारतात निर्माण झाली होती, त्यावेळेस RAW ला पाचारण करण्यात आले, त्यावर RAW ने पंजाबमधील ह्या अतिरेक्यांचा मुकाबला करण्यासाठी दोन सिक्रेट टास्क फोर्सची स्थापना केली होती. काउंटर इंटेलिजन्स टीम – X ( CIT-X) आणि काउंटर इंटेलिजन्स टीम – J (CIT-J.)… CIT-X चे काम होते, पाकिस्तानला टार्गेट करणे तर CIT- J चे काम होते खलिस्तानी अतिरेक्यांच्या ग्रुप्सना टार्गेट करणे. RAW ने या ऑपरेशन अंतर्गत केवळ पंजाब मध्येच नव्हे तर भारतात सर्वत्र पसरलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांना नेस्तानाबूत करून त्यांच्याशी संबधीत पाकिस्तानातील अनेक मेन सोर्सेसना देखील हिट केले होते आणि त्यामुळे पाकिस्तानच्या ISI ने आखलेल्या खलिस्तानी अतिरेकी मोमेंट्सना माघार घेण्यास भाग पडले होते..

३.ऑपरेशन कहूता.
पाकिस्तानची प्रमुख न्यूक्लिर लॅब्रॅटोरी “खान रिसर्च लॅबोरेटरीज (KRL)” मध्ये लॉन्ग रेंज मिसाइल डेव्हलोपमेंट चे मेन काम चालत असे. KRL ही पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रावळपिंडी जिल्ह्यातील कहूता नावाच्या एका छोट्या गावात आहे.

RAW ने तिथे “ऑपरेशन कहूता” राबवले होते, खान रिसर्च लॅबोरेटरीज मधील काही सायंटिस्ट वर पाळत ठेऊन कहुताजवळील न्हाव्याच्या दुकानातुन त्यांनी सायंटिस्टचे कापलेले केस गोळा केले होते, RAW ने त्या केसांच्या नमुन्यांचे विश्लेषण करून पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमांबद्दल माहिती मिळवली होती, त्यात त्यांना आढळले होते की, पाकिस्तान ने न्यूक साठी एनरिच युरेनियम मिळवले आहे..त्यावर, RAW ने खान रिसर्च लॅबोरेटरीज (KRL)” मध्ये एन्ट्री मिळवली होती आणि पाकिस्तान लवकरच भविष्यात न्यूक्लियर टेस्ट घेणार आहे याचा कन्फर्म रिपोर्ट न्यू दिल्ली ला सादर केला होता.
पण…. त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी चुकून पाकिस्तानी तत्कालीन अध्यक्ष झिया-उल-हक यांना पाकिस्तानच्या सिक्रेट अणुकार्यक्रमाची माहिती असल्याचे सांगितले होते त्यावर पाकिस्तानने लगेचच भारतीय RAW स्पाय ना शोधून त्यांना ठार मारले होते. देशासाठी बलिदान देण्यापूर्वी ह्या RAW च्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानमधील न्यूक्लियर प्लांट मध्ये एकूण ०५ वेळा बिघाड करण्यात यश मिळवले होते.

४. ऑपरेशन मेघदूत.
भारतीय सैन्याला आर्क्टिक वेदर गियर पुरवणाऱ्या लंडनस्थित गारमेंट कंपनीकडून RAW ला एक टीप मिळाली होती, टीप अशी होती की भारतीय सैन्याला लागणारे आर्क्टिक वेदर गियर सारखेच सेम आर्क्टिक वेदर गियर पाकिस्तानने देखील त्या गारमेंट कंपनीकडून खरेदी केले होते…RAW ने याची तातडीची दखल घेऊन ऑपरेशन मेघदूत राबवले होते.. ह्या ऑपरेशन दरम्यान पाकिस्तान हा सियाचीन ग्लेशियरमध्ये घुसखोरीची योजना आखत असल्याचे पक्के इंटेल RAW ला मिळाले होते आणि या इंटेल मूळे भारतीय आर्मी ने पाकिस्तानच्या आधी सियाचीन ग्लेशियरचा ताबा घेतला होता… तेव्हापासून ते आजतागायत सियाचीनमधील सर्व प्रमुख व मुख्य शिखरांवर भारताचे वर्चस्व अजूनही कायम आहे.

५. ऑपरेशन चाणक्य.
काश्मीर मध्ये RAW ला ISI समर्थित काश्मिरी फुटीरतावादी गटांमध्ये घुसखोरी करण्याचे काम देण्यात आले होते. ऑपरेशन चाणक्य दरम्यान RAW ने काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी फुटीरतावादी गटांना प्रशिक्षण आणि निधी पुरवण्यात आयएसआयचा सहभाग असल्याचे पुरावे शोधून त्याच्या सोर्स ना कायमचे व्हॅनिश केले होते.. या ऑपरेशनमुळे काश्मीरमध्ये भारत समर्थक गट तयार झाले होते आणि काश्मीर मध्ये शांतता राखण्यास सुरवात झाली होती.

६. ऑपरेशन कॅक्टस.

पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ इलम (PLOTE) च्या ट्रेन्ड २०० तमिळ बंडखोरांनी मालदीववर नोव्हेंबर १९८८ मध्ये आक्रमण केले होते, त्यावर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या पंतप्रधानांना ह्यासाठी विनंती केली होती..तेव्हा RAW ला त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते…त्यावर RAW ने इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही ने मिळून “ऑपरेशन कॅक्टस” राबवले होते… इंडियन एअर फोर्स च्या सहाव्या पॅराशूट बटालियनला आग्रा ते मालदीव येथे नेले होते आणि मालदीवमधील बेटांवर त्या बटालियनला उतरून, स्विफ्ट व प्रिसाईझ ऑपरेशन राबवून अवघ्या काही तासांतच RAW ने मालदीव सरकार व मालदीव ला वाचवून २०० + PLOTE ना ठार मारले होते..

७. ऑपरेशन लीच.
हे ऑपरेशन लीच म्यानमार मध्ये राबवण्यात आले होते, जे कि खूपच किचकट व गुंतागुंतीचे होते.. भारताने म्यानमारमधील वांशिक लोक विशेषत: “अरकान्स” ना मदत करण्याच्या हेतूने व तिथे भारताला सुटेबल व मैत्रीपूर्ण गर्व्हर्मेंट स्थापन करण्यासाठी RAW ने बर्मी बंडखोर ग्रुप “काचिन इंडिपेंडन्स आर्मी (KIA)” ची स्थापना केली होती. त्यांना भारताने आधुनिक शस्त्रे, ट्रेनिंग दिले होते, तसेच त्यांना जेड आणि प्रिशिएस दगडांचा व्यापार करण्यास परवानगी देखील दिली होती… पण पुढे जाऊन हा “काचिन इंडिपेंडन्स आर्मी (KIA)” ग्रुप भारताविरुद्धच उभा राहिला होता… तेव्हा रॉ ने “ऑपरेशन लीच” सुरू केले, यामध्ये म्यानमार आणि भारताच्या हिताविरुद्ध कट रचणाऱ्या त्या ग्रुपच्या ०६ मुख्य बंडखोर लीडरना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते आणि सेकंड इन कमांड असलेल्या ३४ “अराकानी” ना ताब्यात घेण्यात आले होते..आणि भारताला सुटेबल असे गर्व्हर्मेंट म्यानमार मध्ये आणण्यात आले होते.

८. वर्णभेद विरोधी चळवळ.
ह्या ऑपरेशन बद्दल फारशी माहिती कुठेही उपलब्ध नाही, दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातील वर्णभेदविरोधी चळवळीत RAW ने सक्रिय सहभाग घेतला होता. RAW ने आफ्रिकन खंडातील अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले होते. तसेच त्यांच्या गुप्तचर संस्थांच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये आपले अनेक निवृत्त रॉ अधिकारी त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी तिथे गेले होते..

९. इंटेलिजन्स ब्युरो- स्नॅच ऑपरेशन्स.
स्नॅच ऑपरेशन म्हणजे RAW चे स्पाय ऑफिसर्स जेव्हा परदेशात पकडले जातात तेव्हा त्यांना लगेच अज्ञात ठिकाणी चौकशीसाठी नेले जाते, तेव्हां त्यांच्या परत प्रत्यार्पण प्रक्रियेला बरच कालावधी लागतो.. आणि हे सर्व टाळण्यासाठी आणि प्रत्यार्पण प्रक्रियेला बायपास करण्यासाठी स्नॅच ऑपरेशन RAW कडून लगेच राबवले जाते. स्नॅच ऑपरेशनचे उत्तम उदाहरण म्हणजे अक्षय कुमारचा चित्रपट बेबी…अशी बरीच स्नॅच ऑपरेशन्स जगभर RAW ने पार पाडली आहेत.

खलिस्तान कमांडो फोर्सचा भूपिंदरसिंग भुडा, लष्करचा अतिरेकी तारिक मेहमूद आणि अब्दुल करीम टुंडा, २००८ च्या मुंबई हल्ल्याचा एक सूत्रधार शेख अब्दुल ख्वाजा, बॅन दहशतवादी ग्रुप इंडियन मुजाहिदीनचा यासीन भटकळ..यांचे भारतात झालेले अटकसत्र खरे वास्तविक स्नॅच ऑपरेशन्स अंतर्गत विदेशात राबवण्यात आलेली मिशन्स आहेत.

नोंद :- मागील दशकात ६०० हुन जास्त क्लासिफाईड ऑपरेशन्स ” रॉ ” ने यशस्वीरीत्या राबवली आहेत.

जय हिंद.

धनंजय जाधव

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

1 thought on “RAW च्या या 9 ऑपरेशनची माहीत वाचून अभिमानाने फुगेल तुमची छाती”

Leave a Comment