---Advertisement---
नंदुरबार : धडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातच ९०० ग्रॅम गांजा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचारी शशिकांत वसईकर याला निलंबित करण्यात आले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर पथकाने तीन दिवसांपूर्वी वसईकर यांच्या घरावर छापा टाकला. तपासणीदरम्यान गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल
गांजा साठा कसा आला?
संबंधित पोलिस कर्मचाऱ्याकडे गांजा आला कोठून आणि तो विक्रीसाठी होता का, याचा तपास जिल्हा पोलिस आणि धडगाव पोलिस करत आहेत. तसेच, इतर अंमली पदार्थ किंवा गुटख्याच्या साठ्याचाही तपास सुरू आहे.
पोलीस दलाला हादरा
पोलिस दलातील कर्मचाऱ्याकडूनच अशा प्रकारे अंमली पदार्थांचा साठा आढळल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. यामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धडगाव पोलिस ठाण्याने वसईकर याला पोलीस कोठडीत ठेवून पुढील चौकशी सुरू केली आहे.
---Advertisement---

आधीच्या कारवाया आणि नव्याने निर्माण झालेले संकट
धडगाव तालुक्यात पोलिसांकडून गांजा शेतीवर वारंवार कारवाया होत असताना, एका पोलिस कर्मचाऱ्याकडेच गांजा आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू असल्याचे पोलीस पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.