---Advertisement---
जळगाव : शहरातील मोहन टॉकीज परिसरातील एका घरात अवैधरित्या गॅस भरणा केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रांवर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकत ६१ सिलेंडर जप्त केले.
अवैध गॅस भरणा केंद्रामुळे या भागातील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शनिपेठ पोलिसांनी २८ व्यावसायिक सिलिंडर (१० भरलेले, १८ रिकामे) आणि ३३ घरगुती सिलिंडर (१३ भरलेले, १० रिकामे) जप्त केले आहेत. अवैधरित्या गॅस भरण्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी वाहन चालक आदेश राजू पाटील, राहुल नारायण सोनवणे आणि राकेश नारायण सोनवणे यांचा समावेश आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील, कमलेश पाटील, प्रदीप नन्नवरे,योगेश साबळे, गजानन वाघ, निलेश घुगे, अमोल वंजारी, विक्की इंगळे, नवजीत चौधरी, पराग दुसाने यांनी ही कारवाई केली.