ऋषभ पंतचा ‘तो’ शॉट, जो जगाला हसवतो, सचिनने सांगितली त्याची खासियत

---Advertisement---

 

Rishabh Pant : ऋषभ पंत जेव्हा फलंदाजीसाठी येतो तेव्हा मैदानात मनोरंजन होत नाही, असं क्विचितच घडत असेल. पंत केवळ आक्रमक फलंदाजी करत नाही, तर तो असे शॉट्स मारतो जे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी डोकेदुखी ठरतात. विशेषतः त्याचे पॅडल स्वीप किंवा स्कूप शॉट्स अद्भुत असतात. चेंडू सीमा ओलांडतो आणि पंत खेळपट्टीवर पडताना दिसतो. समालोचकांपासून ते चाहत्यांपर्यंत तो सर्वांना हसवतो. पंतचा हा शॉट मारण्याची एक रणनीती आहे, असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतने शतक झळकावले. पंतचे हे कसोटी क्रिकेटमधील सातवे शतक होते, तर इंग्लंडमध्ये हे तिसरे कसोटी शतक होते. यावेळी पंतने पुन्हा एकदा तेच शॉट्स खेळले ज्यामुळे त्याला जगभरात ओळख मिळाली. विशेषतः फिरकी गोलंदाजांविरुद्ध, त्याने यावेळीही मागच्या गुडघ्यावर बसून पॅडल स्वीप आणि स्कूप खेळून धावा काढल्या आणि पुन्हा एकदा त्याच्या या शॉट्सशी संबंधित विनोद आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.

---Advertisement---

 

गेल्या काही वर्षांपासून सामान्य क्रिकेट चाहते पंतच्या शैलीने स्वतःचे मनोरंजन करत असताना, महान फलंदाज मास्टर ब्लास्टरने या शॉट्सच्या बारकाव्यांबद्दल स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, पंतच्या ‘वेडेपणा’मागे एक ‘पद्धत’ आहे. तेंडुलकरने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की पंत खेळपट्टीवर पडतो, जेणेकरून तो चेंडूच्या अगदी खाली येऊन शॉट खेळू शकेल.

महान फलंदाजाने लिहिले की, “पडताना ऋषभने केलेला पॅडल स्वीप हा योगायोग नाही. तो खूप हुशारीने केला आहे. शॉट खेळताना पडल्याने त्याला चेंडूच्या अगदी खाली येण्याची संधी मिळते आणि नंतर पूर्ण नियंत्रणाने तो लेग स्लिपवरून तो स्कूप करतो.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---