David Lawrence Passes Away : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या लीड्स कसोटी सामन्यादरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू डेव्हिड लॉरेन्स यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले आहे. क्रिकेट जगतासाठी ही एक दुःखद बातमी आहे, लॉरेन्सने त्यांच्या लहान पण प्रभावी कारकिर्दीत वेग आणि जोशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुखापतींमुळे लॉरेन्स यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कमी असली तरी, प्रतिभा आणि उर्जेने ते चाहते आणि सहकारी खेळाडूंमध्ये खास बनले.
डेव्हिड लॉरेन्स यांचा जन्म ग्लॉस्टरशायरमध्ये झाला होता. लॉरेन्स यांच्या कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्हाला हे कळवताना खूप दुःख होत आहे की डेव्ह लॉरेन्स यांचे निधन झाले आहे, ते मोटर न्यूरॉन आजाराशी झुंजत होते.’
डेव्हिड लॉरेन्सची क्रिकेट कारकीर्द
डेव्हिड लॉरेन्सने १९८८ मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केले आणि १९९२ मध्ये त्यांनी शेवटचा सामना खेळला. या दरम्यान, त्यांनी ५ कसोटी सामन्यांमध्ये १८ बळी घेतले आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर ४ बळी आहेत. याशिवाय, त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ५१५ बळी घेतले. त्याच वेळी, त्यांनी लिस्ट ए मध्ये १५५ बळी घेतले. एवढेच नव्हे तर २०२२ मध्ये ते काउंटीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.