---Advertisement---

St Bus : तर प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट

---Advertisement---

मुंबई : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात आज १ जुलैपासून करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

१ जूनला एसटीच्या ७७व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्र्यांनी या संदर्भातील घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे.

अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. उत्सवात लाभ येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. दरम्यान, परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---