---Advertisement---
Edible oil rates : गेल्या महिन्यात केंद्र सरकारने कच्चे पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी केले. यामुळे गृहिणींना काहीचा दिलासा मिळाला होता. मात्र, तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली असून, परिणामी सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
---Advertisement---
गेल्या काही महिन्यांपासून दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्य लोकांचे बजेट आधीच कोलमडले आहे. त्यातच तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.
आता १५ लिटर तेलाच्या एका डब्यामागे ६० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, पाम तेल, मोहरीचे तेल आणि वनस्पती तूप या सर्वांच्या दरात वाढ झाली असून, सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या सर्व प्रकारमध्ये किलोमागे ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे १५ लिटरच्या एका तेलाच्या डब्यामागे तुम्हाला ५० ते ६० रुपये अधिक मोजावे लागणार आहे.