---Advertisement---
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय विवाहित महिलेसह एका ३२ वर्षीय विवाहित तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना घटना परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकदरम्यान उघडकीस आली आहे. मात्र, आत्महत्याचे कारण अद्याप समोर आलेले नसून, पाचोरा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
---Advertisement---
मिळालेल्या माहितीनुसार, परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकदरम्यान १ जुलै रोजी मध्यरात्री रेल्वे किमी.नं.२८४ जवळ अपरेल्वे लाईनमध्ये ही घटना घडली. परधाडे येथील विवाहिता मीनाबाई बबलू ठाकरे ( वय २७) व याच गावातील विवाहित तरुण योगेश रामदास ठाकरे (वय ३२) यांनी धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. घटनेची माहिती पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना मिळताच, त्यांनी तत्काळ पाचोरा पोलीस स्टेशनला माहिती दिली.
पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे शव पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी हे करीत आहेत.
पती-पत्नीचे नोंदविले जवाब
तपासी अंमलदार भगवान चौधरी यांनी मयत मिनाबाईचे पती व योगेशची पत्नी या दोघांचे जवाब घेतले असून, या घटनेमुळे परधाडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.