---Advertisement---
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील एका २७ वर्षीय विवाहित महिलेसह एका ३२ वर्षीय विवाहित तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना घटना काल बुधवारी परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकदरम्यान उघडकीस आली. मात्र, आत्महत्याचे समोर आलेले नव्हते. दरम्यान, अखेर आज या दोघांच्या आत्महत्येचे गूढ उलगडले आहे.
परधाडे येथील विवाहिता मीनाबाई बबलू ठाकरे ( वय २७) व याच गावातील विवाहित तरुण योगेश रामदास ठाकरे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या दोघांचे नाव आहे. योगेशला पत्नीपासून तीन मुले व मीना हिला पती बबलू ठाकरे यांच्यापासून तीन मुले आहेत. दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने त्यांच्यात प्रेम संबंध जुळले. ही गोष्ट त्यांच्या कुटुंबीयांना माहित पडल्याने त्यांच्या या प्रेम संबंधाला विरोध सुरु झाला.
---Advertisement---
दरम्यान, दोघांनी घरातून पलायन करत, परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकदरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. घटनेची माहिती पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना मिळताच, त्यांनी तत्काळ पाचोरा पोलीस स्टेशनला माहिती दिली. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे शव पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले.
योगेश दोन दिवसांपूर्वी गावी आला अन्…
योगेश हा मुळचा धुळे जिल्ह्यातील शिरूड येथील असून, परधाडे येथे सासरी राहत होता. दोघांच्या या प्रेमसंबंधामुळे घरात वाद सुरु झाल्याने तो तीन महिन्यांपासून त्याचा बहिणीकडे होता. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी घरी आल्यानंतर दोन दिवसातच ही घटना घडली.