---Advertisement---

बचत गटाच्या पैशावरून वाद, कुटुंबातील तिघांना मारहाण

---Advertisement---

जळगाव : बचत गटाचे जमा केलेले पैसे वेळेवर बँकेत भरण्याचे सांगितल्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करत त्याच्यासह पत्नी व भावाच्या पत्नीला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १० जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कंडारी गावात घडली. याप्रकरणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर मंगळवारी १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात मारहाण करणारे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथून जवळ असलेल्या कंडारी गावात नंदकिशोर नारायण सोनवणे वय ५१ हे आपल्या पत्नी सुरेखा नंदकिशोर सोनवणे यांच्या सोबत वास्तव्याला आहेत. मासे विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १० जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नंदकिशोर सोनवणे यांनी बचत गटाचे सचिव अनुराधा शत्रुघ्न वाणी यांना बचत गटाचे जमा केलेले पैसे वेळेवर बँकेत भरत जा असे सांगितले.

या रागातून शत्रुघ्न अशोक वाणी, अनुराधा शत्रुघ्न वाणी, शोभाबाई अशोक वाणी आणि कविता भरत वाणी सर्व रा. नशिराबाद या चौघांनी नंदकिशोर सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा सोनवणे आणि त्यांच्या भावाची पत्नी मिराबाई नरेश सोनवणे या तिघांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान याप्रकरणी नंदकिशोर सोनवणे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

त्यानुसार मारहाण करणारे शत्रुघ्न अशोक वाणी, अनुराधा शत्रुघ्न वाणी, शोभाबाई अशोक वाणी आणि कविता भरत वाणी सर्व रा. नशिराबाद या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तायडे हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---