---Advertisement---
जळगाव : शहर महापालिकेत जमिनीच्या भूसंपादनापोटी मोबदला मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांचे रॅकेट सक्रीय झाल्याची खळबळजनक माहिती आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत उपस्थित केली असून, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
पावसाळी अधिवेशनात आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेशी संबंधित दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहे. यात काही दिवसांपूर्वी शहरातील नागेश्वर कॉलनीत कुत्र्यांच्या हल्ल्त्यात मृत्यू पावलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याला मनपाकडून आर्थिक मदतीची मागणी. त्यासोबतच आमदार भोळे यांनी मनपातील अधिकाऱ्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
ते म्हणाले की, जळगाव शहरातील गट नं. ५१०/३/५/७ या जमिनीवर २०१२ मध्ये आरक्षण होते. मात्र एका शेतकऱ्याने मनपातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन भूसंपादनापोटील ३ कोटींचा मोबदला प्राप्त करून घेतला होता. आता पुन्हा ह्याच शेतकऱ्याने महापालिकेकडे मोबदल्यापोटी ३२ कोटींची मागणी केली आहे.
शहरातील विकासकामांसाठी एककीडे महापालिका म्हणते निधी नाही, आणि दुसरीकडे एकाच शेतकऱ्याला वारंवार कोट्यावधीचा मोबदला कसा दिला जातो? असा प्रश्न उपस्थित करून महापालिकेत भूसंपादन अधिकाऱ्यांचे रॅकेट असल्याचा संशय आमदार भोळे यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देखिल त्यांनी केली आहे.
---Advertisement---