---Advertisement---

Electric bus jalgaon : जळगावकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार ई-बस सेवा

---Advertisement---

Electric bus jalgaon जळगाव : महापालिकाआपल्या ई-बस प्रकल्पाअंतर्गत आगामी १५ ऑगस्टपासून स्मार्ट बस सेवेस प्रारंभ करणार आहे. या अनुषंगाने मनपा तयारीत करीत आहे. या प्रकल्पाकरिता महानगरपालिका प्रशासन लवकरच १२० चालकांची भरती प्रक्रिया राबविणार आहे.

जळगाव महानगरपालिकेने सार्वजनिक वाहतुकीत आधुनिकता आणण्यासाठी ‘ई-बस सेवा’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ई-बस प्रकल्पाअंतर्गत १२० चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. महानगरपालिका व खाजगी कंपनीच्या संयुक्त भागीदारीतून ही सेवा सुरू केली जाणार आहे.

---Advertisement---

शिस्तबद्ध चालकांची होईल निवड

या ई-बस सेवेअंतर्गत व्यावसायिक परवाना असलेल्या, शिस्तबद्ध आणि अनुभवी चालकांना निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, कंपनीकडून प्रशिक्षणही दिले जाईल.

अशा मिळतील बससेवेतील सुविधा :

वातानकुलीत बस असून आरामदायक आसनव्यवस्था आहे. या बसमधील प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपवरून डिजिटल तिकीट मिळणार आहे. बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. याकरीत बसवर जीपीएस ट्रॅकिंगसह सीसीटीव्ही सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. या बससाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्यात येणार आहे. या ई-बसमुळे प्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी होणार असून इंधन आणि पर्यावरण फायदे मिळणार आहेत.

ई-बस प्रकल्पाअंतर्गत सुरू होणाऱ्या या बस बॅटरीवर चालणाऱ्या असून, त्या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा अधिक पर्यावरणपूरक आहेत. यामुळे दरवर्षी हजारो टन कार्बन उत्सर्जन वाचवले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---