---Advertisement---
अमळनेर : न्यायालयाने आदेश देऊनही पत्नी व मुलीला ४५ महिन्यांपासून खावटीपासून वंचित ठेवणाऱ्या पतीला न्यायालयाने ११ महिन्यांची न्यायालयीन कोठडी सुनावत जळगाव कारागृहात रवानगी केली आहे.
विवाहितेला मंगळग्रह सेवा संस्थेने सेवेकरी म्हणून रूजू करून घेत आधार दिला आहे. कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी अमळनेर न्यायालयाने २०२१पासून संबंधित व्यक्तीची पत्नी व आठ वर्षांच्या मुलीला प्रति माह ३ हजार रुपये खावटी देण्याचे आदेश दिले होते. मात्र पतीने ४५ महिन्यांपासून खावटी जमा केली नाही.
यामुळे तिने न्यायालयात धाव घेतली. पती खावटी भरत नसल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने ११ महिन्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली. महिलेची माहेरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना मंगळग्रह सेवा संस्थेने सेवेकरी म्हणून रूजू करून मदतीचा हात दिला.
मारहाणीत पत्नी बेशुध्द
संबंधित महिलेचे तालुक्यातीलच माहेर आहे. तिचे २७ एप्रिल २०१६ रोजी लग्न झाले होते. त्यांना दीड वर्षानंतर एक मुलगीही झाली. यानंतर पतीने मारहाण, छळ सुरू केला. दांडक्याने मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या. ही बाब समजताच मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांना महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केले.