---Advertisement---
धुळे : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 11011 ) दि. १५ जुलै २०२५ पासून सुधारित वेळेनुसार चाळीसगाव, जामधा, शिरूड आणि धुळे स्थानकांवर पोहोचणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्सप्रेस चाळीसगाव येथे सध्याच्या १९.१० ऐवजी १८.५५ वाजता येईल. जामधा येथे सध्याच्या १९.३० ऐवजी १९.१५ वाजता येईल. शिरूड येथे सध्याच्या २०.०६ ऐवजी १९.४४ वाजता येईल. धुळे येथे सध्याच्या २०.५५ ऐवजी २०.२५ वाजता येईल.
ट्रेन क्रमांक 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्सप्रेसच्या सुधारित वेळेनुसार दि. १५ जुलै २०२५ पासून चाळीसगाव, जामधा, शिरूड आणि धुळे स्थानकांवर पोहोचणार आहे.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, तसेच तपशीलवार वेळ आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा., असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.