---Advertisement---
जळगाव : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची दखल घेत तिरुपती ते हिसारदरम्यान नवीन साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी एकूण २४ फेऱ्यांसाठी नियोजित करण्यात आली आहे. ही गाडी तिरुपती-हिसार-तिरुपती मार्गावर धावणार आहे.
गाडी क्र. ०७७१७ ही विशेष गाडी ९ जुलै ते २४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रत्येक बुधवारी रात्री ११.४५ वाजता तिरुपतीहून सुटेल व शनिवारी दुपारी २.०५ वाजता हिसारला पोहोचेल. गाडी क्र. ०७७१८ ही विशेष गाडी १३ जुलै ते २८ सप्टेबर २०२५ या कालावधीत प्रत्येक रविवारी रात्री ११.१५ वाजता हिसारहून सुटेल व बुधवारी सकाळी ११.३० वाजता तिरुपतीला पोहोचेल.
या विशेष गाडीला रेनिगुंटा, रामपेट, कड्डूपा, येर्रगुंटला, ताडीपत्री, गुत्ती, गुंटकळ, धोन, कुर्नूल सिटी, गदवाल, महबूबनगर, जडचर्ला, काचीगुडा, मलकाजगिरी, मेडचल, कमारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मन्दसौर, नीमच, चित्तौडगड, भीलवाडा, बिजैनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा जं, रिंगस जं, सीकर जं, नवालगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू आणि सादुलपूर आदी स्थानकांवर थांबे आहेत.
एकूण २२ डब्यांच्या या रेल्वेमुळे दक्षिण भारतातील तिरुपतीसारख्या तीर्थक्षेत्रापासून हरियाणातील हिसारपर्यंतचा प्रवास आता अधिक सुलभ आणि आरामदायक होणार आहे.