---Advertisement---
मुंबई : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती व २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असल्याची चिन्हे आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकी घेतला जाणार आहे.
---Advertisement---
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आलेला असतानाच, या बैठकीचे परिपत्रक जारी करून निवडणूक आयोगाने निवडणुकीच मोहिम हाती घेतल्याचे दिसते आहे. येत्या गुरुवारी (१० जुलै) रोजी दुपार १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीचा विषय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका २०२५ आहे.
त्यामुळे राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती व २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असल्याची चिन्हे आहेत.