---Advertisement---

Jalgaon News : खुशखबर ! ‘गिरणा’ ४१ टक्क्यांवर, लवकरच गाठणार पन्नाशी ?

---Advertisement---

जळगाव : मान्सूनच्या ३० दिवसांत सरासरी १२५.३ टक्के पावसाची नोंद झाली असून, निम्म्या जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा प्रकल्पात ४१ टक्क्यांवर उपयुक्त जलसाठा झाला आहे. तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे आवक वाढल्याने हतनूर प्रकल्पाच्या चार दरवाजांतून ४२३७.३० क्यूसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, अग्नावती, बोरी व भोकरबारी हे प्रकल्प कोरडेठाक आहेत.

जिल्ह्यात जूनमध्ये १२३.७मिलिमीटर, तर जुलैचे सरासरी पर्जन्यमान १८९.२ मिलिमीटर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात मान्सूनच्या १६ दिवसांत सरासरी १०५.९ टक्के अर्थात १३५.४ मिलिमीटर, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात ७जुलैला गेल्या २४ तासांत सरासरी १२.५ मिलिमीटरनुसार आतापर्यंत ३८.४ मिलिमीटरसह २०.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ५ ते ६ तालुक्यांच्या सिंचनासह १५० च्यावर ग्रामीण पेयजल योजना अवलंबून असलेल्या गिरणा प्रकल्पात गेल्या सात-आठ दिवसांत सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या २४ तासांत ७.१२ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे गिरणा प्रकल्पाचा साठा ४१.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हतनूर प्रकल्पातही गेल्या २४ तासांत ८.८२ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक होत असून, प्रकल्पाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडून ४२३७.३० क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जातआहे.

आतापर्यंत ११.१ मिलिमीटर पावसाची नोंद

जुलैचे सरासरी पर्जन्यमान १८९.२ मिलीमीटर असून गेल्या २४ तासात १२.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात जळगाव ९.२, भुसावळ १३.३, यावल १.९, रावेर ०.६, मुक्ताईनगर १०.०, अमळनेर ४.२, चोपडा ३.७, एरंडोल १९.४, पारोळा ४१.७, चाळीसगाव ८.७, जामनेर २३.६, पाचोरा १७.६, भडगाव १२.८, धरणगाव ६.०, बोदवड १५.६ नुसार आतापर्यंत जिल्ह्यात १२.५ मिलिमीटर अर्थात ३८.४ टक्के, तसेच आतापर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यात २०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

‘हतनूर’ मधून २२४८ क्यूसेकचा विसर्ग

हतनूर प्रकल्प तापी नदी पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत सरासरी ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ८.८२ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. हतनूर प्रकल्पाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडून चार हजार २३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

जिल्ह्यात ३५.६७ टक्के जलसाठा

जळगावकरांची तहान भागविणाऱ्या वाघूर प्रकल्पात ६४.३५ टक्के उपयुक्त जलसाठा असून, आतापर्यंत २८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १४ मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा ६६.९३ मिलिमीटर, मंगरूळ ४२.९४, सुकी ९२.६४, मोर ६३.७३, गूळ ५३.०६, अंजनी ३३.४४, बहुळा २४.००, मन्याड ११.५६, शेळगाव १२.४२, तोंडापूर ६.७६, हिवरा २.४७ मिलिमीटर, असा सुमारे १९.६२ टीएमसी अर्थात ३५.६७टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील प्रकल्प पाणलोट क्षेत्रात सरासरी १५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---