---Advertisement---
धुळे : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन गावातून घडली. किरकोळ वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली. ही घटना ७ रोजी घडली. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
देवा गुलाब बहिरम (वय २५, रा. झेंडेअंजन) आणि विकास विजय महाले हे दोघे चांगले मित्र होते. ७ जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास गावामध्ये काही कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक असलेला हा वाद हळूहळू विकोपाला गेला. रागाच्या भरात विकास महाले याने कोणतीही दयामाया न दाखवता देवा बहिरमच्या डोक्यात दगड टाकला. या हल्ल्यात देवा जखमी होऊन मृत्यूमुखी पडला.
गंभीर जखमी अवस्थेत देवाला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत संशयित आरोपी विकास महाले यास अटक करण्यात आली आहे. सध्या विकास महाले पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
---Advertisement---