---Advertisement---
IND vs ENG 3rd Test : लॉर्ड्स कसोटीत दुसरे सत्र सुरू झाले असून, रूट-पोप जोडी क्रीजवर आली आहे. टीम इंडियासाठी दुसऱ्या सत्रातील पहिले षटक जसप्रीत बुमराहने टाकले. इंग्लंडने २ विकेट गमावल्यानंतर ९२ धावा केल्या आहेत. रूट २५ धावा करून नाबाद आहे आणि पोप १६ धावा करून नाबाद आहे. टीम इंडियाची आता रूटच्या विकेटकडे लागली आहे.
भारत : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, करुण नायर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडेन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर
भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका
भारत आणि इंग्लंडमधील ५ कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकली. तर एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने ३३६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. आता अशा परिस्थितीत लॉर्ड्स कसोटी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची बनली आहे. लॉर्ड्स येथे जिंकून दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याचा इरादा ठेवतील.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आज लॉर्ड्सच्या मैदानावर २० वा कसोटी सामना खेळला जाणार आहे. याआधी खेळलेल्या १९ कसोटी सामन्यांपैकी भारताने फक्त ३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर १२ कसोटी सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.