---Advertisement---
जळगाव : जगभरात भू-राजकीय तणाव कमी झाला असला, तरी जागतिक आर्थिक जगात सुरू असलेल्या अशांततेमुळे सोन्याच्या किमतीत अस्थिरता दिसून येत आहे. जळगावमध्ये सोने दारात एकाच दिवसात १००० रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे आता सणासुदीचे दिवस जवळ येताना आहे. परिणामी ग्राहकांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९७,३०० (जीएसटीसह १००२१९) रुपयावर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८९,१९५ रुपये प्रति तोळ्यावर आहे. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर असून, सध्या ती एक किलोचा दर विनाजीएसटी १०८००० रुपयावर आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोने ९८,४१० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर देखील वाढला असून तो ९०,२१० रुपयांना व्यवहार करत आहे. आर्थिक राजधानी मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोने ९८,४१० रुपयांना विकले जात आहे. तथापि, आज चांदीच्या किमतीत १०० रुपयांची घसरण झाली असून, ते १,०९,००० रुपयांना विकले जात आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोने ९८,५६० रुपयांना विकले जात आहे. मुंबई तसेच कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये आज सोने ९०,२१० रुपयांवर व्यवहार करत आहे.
दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत ९०,३६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जर आपण चांदीबद्दल बोललो तर, आज दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये ते १,०९,९०० रुपये प्रति किलोने विकले जात आहे, तर चेन्नईमध्ये चांदीची किंमत १,२०,०० रुपये आहे.