---Advertisement---
Ujjwal Nikam : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम यांच्यासह चार सदस्यांची राज्यसभेसाठी नियुक्ती केली आहे. यात निकम यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, तर अन्य सदस्य सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी गेल्या लोकसभेत भाजपाकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु आता या घोषणेमुळे त्यांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तर अन्य सदस्य सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती केलेल्या चार सदस्यांमध्ये ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम, सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.
गेल्या लोकसभेत उज्वल निकम यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु आता या घोषणेमुळे त्यांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.