---Advertisement---
जळगाव : आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेतर्फे दि.12 जुलै ते 16 जुलैदरम्यान सेऊल दक्षिण कोरिया येथे पाच दिवसीय जागतिक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
यात विविध देशातील राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक उपस्थित असणार आहेत. भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांचाही सहभाग असून, ते नुकतेच दक्षिण कोरियाला रवाना झाले आहे.
प्रा.डॉ.सुनील नेवे हे या आंतरराष्ट्रीय परिषदेत “दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण: सध्याच्या परिस्थितीत भारत-पाकिस्तान आणि बांगलादेशचे तुलनात्मक विश्लेषण” या विषयावर शोधनिबंध सादर करणार आहे.
प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी दक्षिण आशियामध्ये विशेषतः भारत-पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये राजकीय ध्रुवीकरण हा एक कसा महत्त्वाचा मुद्दा आहे हे आपल्या शोधनिबंधात स्पष्ट केलेले आहे.