---Advertisement---

धक्कादायक ! आधी लग्नाचे आमिष अन् नंतर अत्याचार, जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका नराधमाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. या अल्पवयीन मुलीला चेतन अमोल सोनवणे (रा. दुसखेडा, ता. यावल) याने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला पळवून नेत मुक्ताईनगरच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

---Advertisement---

घडलेला प्रकार या मुलीने आपल्या कुटुंबात सांगितल्यानंतर फैजपूर पोलिस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पो. नि. रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहेत.

महिलेसह मुलांना वादातून मारहाण

जळगाव : किरकोळ कारणावरून वाद होऊन घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यासह सुनीता संजय पाटील (४०, रा. पांढरद, ता. भडगाव) यांना मारहाण करण्यात आली. तसेच घरात जाऊन मुलांनाही मारहाण केली. ही घटना १३ जुलै रोजी पांढरद या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---