---Advertisement---
अमळनेर : गांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांना अमळनेर पोलिसांनी अटक केली. १५ रोजी जळोद शिवारात ही कारवाई करण्यात आली. महेश कैलास पाटील (वय ३१, रा. मेन रोड, जडे गल्ली, भडगाव) व नितीन शरद गौंड (मसराम) (वय १९, रा. गौंडबस्ती देशमुखनगर, पाचोरा) अशी संशयितांची नावे आहेत.
हे दोन्ही संशयित मोटारसायकलवर येणार असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी सापळा रचला. तीन लाख रुपये किमतीचा १५ किलो गांजा व ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. पोकाँ अमोल पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन दोघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, रवींद्र पिंगळे, सपोनि सुनील लोखंडे, संतोष नांगरे, प्रशांत पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, उज्ज्वलकुमार म्हस्के, हर्षल पाटील, योगेश बागुल, समाधान सोनवणे, सुनील पाटील व पूनम हटकर यांनी ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुनील लोखंडे हे करीत आहेत.