---Advertisement---

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; बचत गटाचे साडेचार लाख लांबवले, एरंडोलातील घटना

---Advertisement---

जळगाव : एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भरत पाटील या बचत गटाची कर्जाची रक्कम स्टेट बैंक एरंडोल शाखेतून काढून घरी जात असताना दुचाकीवरील दोघांनी रोकड असलेली पिशवी धूम स्टाईलने लांबवली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथे सावित्री महिला बचतगट असून त्यात एकूण १० सदस्य आहेत. या बचतगटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भारत पाटील या आहेत. उमेद अभियानांतर्गत मे महिन्यात ६ लाख रुपयांचे कर्ज या बचत गटास मंजूर असून १ लाखाची रक्कम याआधी त्यांनी काढलेली आहे. मात्र या कर्जाचे सुमारे ४० हजारांचे २ हप्ते कपात होऊन या बचत गटाच्या बँक खात्यावर ४ लाख ६० हजार एवढी रक्कम शिल्लक होती.

रक्कम काढली अन्..

बुधवारी दुपारी सुतार व पाटील या दोन्ही बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एरंडोल येथे स्टेट बँकेत जाऊन ही रक्कम धनादेशाद्वारे काढली. ती रक्कम कापडी पिशवीत ठेऊन घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---