---Advertisement---
धुळे : पत्नीला मूलबाळ होत नसल्याने नैराश्येत असलेल्या पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील जळोद येथे ही घटना गाडली. कैलास विजयसिंग भील (३८ रा. जळोद) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील जळोद येथे कैलास विजयसिंग भील (३८) वास्तव्याला होते. दरम्यान, पत्नीला मूलबाळ होत नसल्याने ते चिंतेत राहायचे. दि. १३ रोजी घरातील लोकांना तहऱ्हाडकसबे येते जाऊन येतो, असे सांगून निघाले असता ते परतलेच नाही.
त्यामुळे त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. दि. १५ रोजी गावातील गुरे चारणारा लहान मुलगा किसन वासुदेव भील याने माहिती दिली की, जळोद-मुखेड रस्त्यावर एका झाडाच्या खाली कैलास भील हा बेशुद्ध अवस्थेत पडला आहे. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.