---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता ; जाणून घ्या कधी ?

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असता तरी सर्वदूर सारख्या प्रमाणात झालेला नाही. बहुतांश भागात कमी -अधिक प्रमाण असून जळगाव-भुसावळ वगळता अन्य तालुक्यात तसेच जिल्हाभरात जुलै मधील सरासरीच्या निम्मेदेखील पर्जन्यमान गाठलेले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या सप्ताहात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आगामी सप्ताहात मात्र जोरदार ते मध्यम पर्जन्यमान राहणार असल्याची शक्यता हवामान वेधशाळा अभ्यासकांनी वर्तविली आहे.

जूनमध्ये सरासरी गाठली मात्र जुलैत तूट

जळगाव जिल्ह्यात वार्षिक ९ हजार ५७४.९८ मिलीमीटर पाऊस अपेक्षीत असून मान्सून कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ६३८.३३ मिलीमीटर आहे. हवामान विभागाकडून जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १२३.७ मिलीमीटर असून जूनच्या २३ दिवसापैकी १६ दिवसात १२४.० मिलीमीटर नुसार सरासरी १०० टक्के पाऊस झाला आहे.

तर जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १८९.२ मिलीमीटर आदवसात ५६ जानेपर्यंत केवळ ८ २९.८ टक्के सरासरी पाऊस झाला आहे.
जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली असून आतापर्यंत जुलै महिन्यात ७२ टक्के पावसाची तूट असल्याचेच दिसून येत आहे. असमाधानकारक पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्टयातील चाळीसगाव, पाचोरा, भडगावसह अन्य तालुक्यात पिके कोमेजण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.

आगामी सप्ताहात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

आगामी सप्ताहात मात्र तापमानात बदल होऊन आकाश अभ्राच्छादित राहील. तसेच ढगांच्या गडगडाटांसह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान वेधशाळा अभ्यासकांनी वर्तविली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---