---Advertisement---
किशनपूर : इंदूरच्या सोनम रघुवंशीचे प्रकरण ताजे असताना, आता किशनपूरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे महिलेला तिसरे लग्न करायचे होते, मात्र पती अडसर ठरत होता. त्यामुळे तिने प्रियकरासह पतीची हत्या तर केलीच, पण ही हत्या अज्ञाताने केली आहे, असे दाखवण्यासाठी दोघांनी मृतदेह एका आंब्याच्या बागेत फेकून दिला. मात्र, पोलिसांनी तपास चक्रे फिरवत घटनेचा उलघडा केला असून, रीना ही सोनमपेक्षाही चार पाऊले पुढे निघाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस सूत्रानुसार, ३६ वर्षीय रीनाचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या पतीचा मृत्यू झाल्यामुळे तिने १० वर्षांपूर्वी प्रदीप कुमारशी लग्न केले होते. दरम्यान, तिचे गावातील सालेख नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध सुरू झाले.
काही दिवसानंतर दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं मात्र, प्रदीप अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी त्याचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानुसार दोघांनी प्रदीपची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर ही हत्या अज्ञाताने केली आहे, असे दाखवण्यासाठी त्यांनी मृतदेह एका आंब्याच्या बागेत फेकून दिला.
---Advertisement---
पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या किशनपूर गावात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रदीप कुमारचा पुतण्या मंगेराम याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असता, गावातील सालेख हा फरार असून, त्याचा मोबाईलदेखील बंद असल्याचे समोर आले.
त्यानंतर प्रदीपची पत्नी रीना हिची चौकशी केली असता, तिने सालेखसोबत प्रेमसंबंध असल्याने प्रदीपला संपवण्याचा कट रचल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली असून, दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडीत सुनावण्यात आली असल्याची माहिती पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिली.