---Advertisement---
जळगाव : यावलच्या कुरेशी समाजाने गोवंशहत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घेतला आहे. यावल शहरात झालेल्या बैठकीत, गोवंशची कत्तल किंवा त्या उद्देशाने खरेदी करताना आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर २५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
यावल, किनगाव, फैजपूर आणि मारुळ येथील कुरेशी समाजाच्या प्रतिनिधींनी ख्वाजा मशिदीजवळ बैठक आयोजित केली होती. यासंबधीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी समाजाने हा निर्णय घेतला आहे.
या ठरावानुसार, जर कुरेशी समाजातील कोणीही व्यक्ती वरील कृत्य करताना आढळल्यास, त्याच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईलच, पण त्याव्यतिरिक्त समाजाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबद्दल २५ हजार रुपयांचा दंडही आकारला जाईल, असे बैठकीत ठरले आहेत.