---Advertisement---

नागरिकांनो, ‘टाइम ऑफ द डे’ वीज वापरा अन् बिलात मिळवा सवलत !

---Advertisement---

Smart meter : महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसाठी ‘टाइम ऑफ द डे’ वीज दर सवलत सुरू झाली आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर आहेत, अशा ग्राहकांना दिवसा, म्हणजे सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत वापरलेल्या विजेवर प्रती युनिट ८० पैसे सवलत मिळेल, ही सवलत पुढील पाच वर्षासाठी राहणार आहे.

नवीन वीज जोडणीकरिता टीओडी मीटर वापरण्यात येत आहेत. टीओडी मीटर बसविण्याच्या करारानुसार ठेकेदाराने मीटर बसवून या मीटरची देखभाल दहा वर्षे करायची आहे. मात्र, काही भागांत गैरसमजातून ग्राहक टीओडी मीटरला विरोध करीत महावितरणमार्फत आहेत.

बसविण्यात येणाऱ्या टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासानुसार उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांचे त्यांच्या वीज वापरावर व पर्यायाने वीज बिलावर नियंत्रण राहणार आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ८५ हजार टीओडी मीटर बसविण्यात आले असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर नंदुरबार जिल्ह्यात टीओडी मीटर बसविण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु करण्यात आली आहे. प्रामुख्याने दीड लाखांपेक्षा अधिक घरगुती वीज ग्राहकांना नजरेसमोर ठेवून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यानंतर औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांना हे मीटर मिळणार आहे.

टीओडी मीटर काय?

टीओडी मीटरमधून वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक युनिटची रिअल टाईम माहिती ही ग्राहकास मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीज वापरानुसार रीडिंग येत नसेल तर ग्राहकास हे कळणार आहे.

बसविण्यात येणारे टीओडी मीटर हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त लॅबमधून चाचणी केलेले असल्याने ग्राहकांना वापरा इतकेच वीज बिल मिळणार आहे. अत्यंत नावीन्यपूर्ण सुविद्या वीज ग्राहकांना टीओडी मीटरमुळे मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---