---Advertisement---

डीबीटी अनुदान मिळवायचे आहे ? मग बँक खात्याला करा आधार लिंक

---Advertisement---

धुळे : जिल्हयातील शिरपूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी विविध शासकीय योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात (डीबीटी) मिळवण्यासाठी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे.

एप्रिल २०२५ पासून सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे अनुदान थेट आधार संलग्न खात्यांवर जमा होत असल्याने, ही लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना या सर्व योजनांचे लाभार्थी आता डीबीटीद्वारेच अनुदान प्राप्त करत आहेत.

नियमित अनुदानासाठी बँक खाते अपडेट करा

लाभार्थ्यांच्या आधार कार्डवरील मोबाइल नंबर आणि नाव हे बैंक खात्यावरील माहितीशी जुळणे अनिवार्य आहे. ही माहिती जुळल्यास आणि आधार लिंक असल्यासच लाभार्थ्यांना डीबीटीमार्फत अनुदान मिळेल. यासंदर्भात १७ जुलै रोजी शिरपूर तहसील कार्यालयात राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

यात लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट करून बँकेत केवायसी करणे अत्यावश्यक असल्याचे समोर आले. त्यामुळे सर्व सामाजिक अर्थसाहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करून बँकेला लिंक करण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---